


प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
छावा मराठा सेनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी संगिताताई कड तसेच महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी ज्योतीताई पडवळ व पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी ज्योतीताई खंडाळे,पुणे जिल्हा सचिव पदी चारुशीला पुरी यांची निवड करण्यात आली.नवनियुक्त पदाधिकारी यांनासंस्थापक अध्यक्ष सुनिल भाऊ भोर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सोमवार दि. १ डिसेंबर २०२५ रोजी छावा मराठा सेनेची महिला आघाडीची बैठक नारायणगाव येथील मुख्य जनसंपर्क कार्यालय येथे संस्थापक अध्यक्ष सुनिल भाऊ भोर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली.यावेळी रिक्त असलेल्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी असलेल्या संगिता ताई कड यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी ज्योतीताई पडवळ व पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी ज्योतीताई खंडाळे ,पुणे जिल्हा सचिव पदी चारुशीला पुरी यांची निवड करण्यात आली असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल भाऊ भोर व महिला आघाडी केंद्रीय अध्यक्षा प्रियंका ताई भोर यांसह प्रमुख पाधिकार्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पत्रकार मनेश तळेकर, विशाल भराटे, शितल भिसे, आश्विनी भोसले, वैशाली बढे, चंद्रकला मोळे, आशा आहेर, सुनंदा शेंडे, शर्मिला सरोदे, मंगल धनवे यांसह महाराष्ट्रभरातून अनेक पदाधिकारी उपस्थित होते. छावा मराठा सेनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी संगिताताई कड तसेच महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी ज्योतीताई पडवळ व पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी ज्योतीताई खंडाळे , पुणे जिल्हा सचिव पदी चारुशीला पुरी यांची निवड करण्यात आल्याने सर्वांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Share this content:
