प्रतिनिधी-संतोष गाडेकर
राजगुरुनगर :- श्री विश्वकर्मा सुतार लघु उद्योग असोसिएशन खेड तालुका या संस्थेच्या माध्यमातून श्री प्रभू विश्वकर्मा जयंतीचे आयोजन माघ शुद्ध त्रयोदश, शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी संपन्न होत आहे. त्या निमित्ताने विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे होणार आहे कार्यक्रमाचे मुख्य स्थळ:- श्री विश्वकर्मा मंदिर, सुतार समाज गढई मैदान राजगुरुनगर शहरात खेड तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ पासून श्री चा अभिषेक व गायत्री महायज्ञ श्री सत्यनारायणाची महापूजा, महाप्रसाद करण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरातील नामांकित महिला भजनी मंडळाचे कार्यक्रम संपन्न होणार आहे. भोसरी येथील सुतार समाजाचे गुरुदत्त महिला भजनी मंडळ कार्यक्रम नियोजित वेळेनुसार होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर उपस्थिती मध्ये आदरणीय सन्माननीय खेड तालुक्याचे कार्यक्षम आमदार बाबाजी शेठ काळे, (खेड तालुका कार्यक्षम आमदार) आदरणीय श्री दिलीप शेठ मोहिते पाटील, ( माजी आमदार खेड तालुका) खेड तालुक्यातील युवा तरुणांसाठी नेतृत्व करणारे युवकांचे आशा स्थान असणारे आदरणीय सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य माननीय अतुलभाऊ देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होणार आहे .मंदिरामध्ये राजगुरुनगर शहरातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय माननीय मंगेशदादा गुंडाळ, राजगुरुनगर शहरातील बिनविरोध महिला नगरसेविका सुप्रिया ताई राहुल पिंगळे, ( सभापती सांस्कृतिक आरोग्य स्वच्छता विभाग नगरपरिषद) मित्रसेन प्रकाश डोंगरे , नगरसेवक सचिन मधवे, नगरसेवक गढई मैदान परिसर राहुल चौक , बाजारपेठ, राजगुरूनगर येथील नगरपरिषद नगरपालिकेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा भव्य नागरी सत्कार होणार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक खेड तालुक्यातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. सर्व मान्यवरांना आमंत्रित केले आहे. त्यांना कार्यक्रमाची पत्रिका देऊन सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे . खेड तालुक्यातील प्रभू विश्वकर्मा सुतार समाज खेड तालुका प्रभु विश्वकर्मा सुतार समाज पांचाळ सुतार, सर्व सुतार समाज बांधव , खेड तालुक्यातील सुतार समाजातील फर्निचर प्लाऊड व्यावसायिक,कारागर, फर्निचर व्यवसाय दुकानदार, मोटार गॅरेज उद्योजक , सुतार व्यावसायिक या सर्वांचे सहकार्य आहे. तन, मन, धनाच्या माध्यमातून प्रभू विश्वकर्मा मंदिर गढई मैदान सहकार्य करत आहे. राजगुरुनगर चांडोली येथील श्री शत्रुघ्न शर्मा, यांचे सर्व बंधूंचे परिवार या मंदिरासाठी सहकार्य करून आर्थिक योगदान दिले आहे. राजगुरुनगर शहरातील प्लायवूड फर्निचर व्यवसाय करणारे जांगिड परिवार, पांचाळ परिवार, प्लायवूड कारखानदारी व्यवसायिक करणारे यांचा समावेश आहे, प्रभू विश्वकर्मा मंदिरात जयंती साजरी करण्यासाठी यांचे मोठे योगदान आहे. श्री विश्वकर्मा सुतार समाज लघुउद्योग असोसिएशन खेड तालुका नवनिर्वाचित अध्यक्ष श्री निवृत्ती नागुजी भालेराव, श्री रमेश धोंडीबा सुतार कार्याध्यक्ष, श्री लहू ज्ञानेश्वर सुतार ( उपाध्यक्ष) श्री कैलास भाऊ यशवंत सुतार :- सचिव, श्री रमेश निवृत्ती राजगुरू ( सहसचिव ) श्री चंद्रकांत दत्तात्रेय लोहा र ( खजिनदार) श्री दत्तात्रेय तुकाराम भालेराव ( सहजिनदार) विश्वस्त मंडळ श्री ज्ञानेश्वर बबनराव सुतार, श्री रंगनाथ बबनराव सुतार, श्री प्रवीण ज्ञानेश्वर सुतार , श्री दिलीप नामदेव सुतार, श्री संतोष रामदास गाडेकर, श्री शत्रुघ्न शिवन शर्मा श्री शांताराम दाजी अभंग, श्री अभिजीत संभाजी सुतार सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या माध्यमातून प्रभु विश्वकर्मा जयंतीचा उत्सव संपन्न होणार आहे समाज बांधव, देणगीदार सर्व सुतार समाज बांधव यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे कार्यक्रमाची शोभा वाढवावी मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न करण्यात येण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Share this content:
