प्रतिनिधी : उत्तमराव खेसे.
डॉ. मुरलीधर आरू यांची डॉक्टर क्षेत्रात प्रभावी नाव असलेल्या आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या पुणे जिल्हा सचिव (ॲक्युपंक्चर विभाग) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन ही संस्था संपूर्ण भारतात तसेच भारताबाहेर आयुष चिकित्सा पद्धतीच्या प्रसार, प्रचार व विकासासाठी कार्यरत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे १ फेब्रुवारी रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र महाअधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील आयुर्वेद, होमिओपॅथी, योगा, नॅचरोपॅथी, युनानी, ॲक्युपंक्चर आदी क्षेत्रातील अनेक चिकित्सक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अधिवेशनात आयुष चिकित्सेचा प्रसार-प्रचार व संघटन विकास यावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच विविध विभागांतील अनेक मान्यवरांना महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती देण्यात आली.
यावेळी व्हाईस चेअरमन डॉ. नितीनराजे पाटील, चेअरमन डॉ. सतीश कराळे, अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, डॉ. अभिजित कवठकर तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share this content:
