प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
दिनांक 22/02/ 2026 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026 अंतर्गत आरोग्याचा ध्यास महाराष्ट्राचा विकास सदरामध्ये लोकाभिमुख निर्णय, योजना, उपक्रम यामध्ये महाराष्ट्र पॅलेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ आणि मेनोपॉज क्लिनिक राज्यस्तरीय लोकार्पण सोहळ्या अंतर्गत महाआरोग्य सन्मान पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या निमित्ताने मा. ना. प्रकाशजी आबिटकर साहेब मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र शासन आणि श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र शासन यांच्या शुभहस्ते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याला दोन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी मा. गजानन पाटील (भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे डॉ.भगवान पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ पुणे डॉ. रामचंद्र हंकारे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली एबीडियम ई – सुश्रुत मध्ये उत्कृष्ट काम केल्याने खेड तालुक्यातील राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राथमिक आरोग्य केंद्र राजगुरुनगर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे व अधिकारी व कर्मचारी तसेच द्वितीय क्रमांक प्राथमिक आरोग्य केंद्र कडूस येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद दौंडकर व अधिकारी व कर्मचारी यांना आरोग्य रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याच प्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती खेड यांच्याकडून हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच आज ज्येष्ठ नागरिक संघ व
राजगुरुनगर नगरपरिषदचे सर्व महिला सदस्य यांनी प्रा. आ. केंद्राचा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान केला.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Share this content:
