प्रतिनिधी दत्ता भगत सर
-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली या शाळेत जॅग्वार लॅंडरोवर कंपनीच्या वतीने चाळीस बेंचेस आणि आयसीसी फाउंडेशन कडून दहा लक्ष रुपयांचे ७.५ केवीचे सौर ऊर्जा प्रकल्पाचे साहित्य बसविण्यात आले. यावेळी उप स्थितांमध्ये जॅग्वार लॅंडरोवर कंपनीचे प्रतिक मुदकन्ना साहेब,राजीव गौर साहेब,
शिक्षणविस्तार अधिकारी जीवन कोकणे ,केंद्रप्रमुख एकनाथ लांघी ,शाळा व्यवस्थापन चे मा.अध्यक्ष रामदास सावंत,शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका सविंद्रा गारगोटे ,रामदास लांघी ,संतोष लोखंडे ,अविनाश शिंदे ,सुजाता गायकवाड ,प्रिया देवरे-दाभाडे , शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व विध्यार्थी उपस्थित होते. बेंचेस व सौरऊर्जा प्रकल्प मिळाल्या बद्दल विद्यार्थी आणि शिक्षक वर्गामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण दिसून आले. आलेल्या सर्व अधिकारी मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाने केले.
Share this content:
