

प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
कुंडेश्वर विद्यालय पाईट या शाळेसाठी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) निधी उपक्रमाअंतर्गत टाटा ट्रस्ट, टाटा ऑटोकॉम व युवा मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या हॅन्डवॉश स्टेशन, नवीन शौचालय युनिटचे व स्वच्छता गृहाचे नुतनीकरण, हॅपी पीरेड रूम व वेंडिंग मशीन या कामांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी युवा मित्र फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले, सोबतच या प्रकल्पांतर्गत मुलांना स्वच्छतेच्या सवयी अणि मासिक पाळी व्यवस्थापन याविषयी जनजागृती करण्यात आली.
यावेळी उपस्थित युवा मित्र फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक आकाश सूर्यवंशी,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा भारतीताई डांगले, उपाध्यक्ष गुलाब खेंगले, भाजप युवा मोर्चा पश्चिम विभागा अध्यक्ष महादू डांगले,मुख्याध्यापक प्रदीप घोडके,अच्युतराव भालेकर,अंकिता आंबडकर,विजया डांगे, राजेंद्र वाघमारे, वैशाली फाकटकर, संदीप गायकवाड, संजय केदारे , संभाजी खतोडे, दीपक घोलप विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद व इतर मान्यवर उपस्थित होते.या शाळेस युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा भारतीताई डांगले, उपाध्यक्ष गुलाब खेंगले यांच्या माध्यमातून CSR अंतर्गत भौतिक सुविधा मिळणेसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
Share this content:
