




प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द – कुरुळी जिल्हा परिषद विकासगटातील ग्रामपंचायत वडगाव घेनंद येथे उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वामिनी महिला ग्रामसंघ कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.उद्घाटन मा. श्री. गजाननजी पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पुणे), मा. श्री. चंद्रकांतजी वाघमारे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पुणे), मा. श्रीमती शालिनी कडू (प्रकल्प संचालक, जि. प. पुणे), मा. श्री. विशाल शिंदे (गटविकास अधिकारी, पं. स. खेड) आणि मा. श्री. सुनिल भोईर (सहाय्यक गटविकास अधिकारी, पं. स. खेड), श्री.सुखदेव साळुंके (विस्तार अधिकारी) श्री.परेश देशपांडे (तालुका अभियान व्यवस्थापक) अर्चना गडदे (तालुका व्यवस्थापक), श्रीम.सोनाली पवार (प्रशासक) श्रीम.सारिका वाडेकर / साबळे (ग्रामपंचायत अधिकारी) अनिल वखरे (प्रभाग समन्वयक) सौ.नूतन बवले (CRP) तसेच स्वामिनी महिला ग्रामसंघाचे सर्व पदाधिकारी आणि बचत गटातील सर्व महिला मोठ्या संखेने उपस्थीत होते.
यावेळी गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन सोहळाही संपन्न झाला.
ग्रामसंघाची भूमिका आणि महिलांचा सहभाग:
स्वामिनी महिला ग्रामसंघांतर्गत गावामध्ये 26 महिला स्वयंसहाय्यता बचत गट कार्यरत आहेत, ज्यामध्ये गावातील गरीब आणि गरजू महिलांचा समावेश आहे. सुमारे 270 महिला या ग्रामसंघाचा भाग आहेत. ग्रामपंचायत मार्फत ग्रामसंघ कार्यालयास कलर प्रिंटर, 15% भांडी सेट, शिलाई मशीन, बटाटा किस व वेफर्स मशीन, पापड पीठ मळणे, व पापड करणे मशीन, शेवई मशीन, कुरडई चीक काढणे मशीन, वेडिंग मशीन, कार्यालयीन आवश्यक साहित्य देण्यात आले. तसेच नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 01 एप्रिल रोजी जे घरपट्टी भरतील त्यांना 5% सूट देऊन वरील योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. असा नावीन्य पूर्ण उपक्रम ग्रामपंचायत मार्फत राबवण्याचे ठरवले आहे. तसेच लोकवर्गणीतून सौ शशिकला घेनंद (मा.सरपंच ), प्रतीक्षा गव्हाणे, सारिका वाडेकर ( ग्रामपंचायत अधिकारी) यांच्या वाढदिवसानिमित्त गावात पाणपोई सप्रेम भेट देण्यात आले. व गावातील विधवा महिला सोनाली एकनाथ घेनंद यांना उद्योग व्यवसायासाठी कोमल नितनवरे, नूतन बवले, सारिका वाडेकर यांच्यामार्फत शिलाई मशीन भेट देण्यात आली. तसेच ओला व सुका कचरा वर्गीकरण करणेबाबतचा जनजागृती विडिओ कोमल नितनवरे यांच्या मार्फत करण्यात आला. गावामध्ये वाचनालयाची सुरुवात श्री. चरणदास नितनवरे, शाम बवले, अमोल नितनवरे यांनी गावात वाचनालयाची संकल्पना सुरु केली.बवले वस्ती येथील अंगणवाडीवाडी ला श्री. विजय बवले यांनी पाणी दिले. तसेच पर्णकुटी संस्थेमार्फत आरी वर्क नथ मेकिंग व शिलाई मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच ग्रामसेविका सारिका वाडेकर यांनी महिलांना सुतळीची पायपुसणी व खेळावरचे लोकरचे रुमाल यांचे प्रशिक्षण दिले. “उमेद” अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहांना फिरता निधी, समुदाय गुंतवणूक निधी आणि बँक कर्ज योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. यामुळे गावातील महिलांचे शाश्वत उपजीविकेकडे सक्षमपणे वाटचाल सुरू झाली आहे.
या कार्यक्रमास पंचायत समितीचे खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच गावातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share this content:
