प्रतिनिधी : उत्तम खेसे.
खेड–आळंदी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण व दिलासादायक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नाशिक फाटा ते राजगुरुनगर (खेड) या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी उन्नत मार्ग (फ्लायओव्हर/हायवे) प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात सेवा रस्त्यांच्या बांधकामासाठी आवश्यक भूसंपादनाकरिता राज्य शासनाने आज २०० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे.
या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक व नागरिकांची वाहतूक होत असल्याने अपघात, कोंडी व वेळेचा अपव्यय होत होता. सेवा रस्त्यांची निर्मिती झाल्यानंतर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, प्रवासाचा वेळ व इंधन खर्च वाचेल तसेच स्थानिक नागरिक, उद्योगधंदे व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
हा निर्णय ग्रामीण व विकासात्मक धोरणांना चालना देणारा असून परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा ठरणार आहे. जनतेच्या सेवेसाठी आणि विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचा हा सकारात्मक परिणाम असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
ही वाहतूक कोंडी कमी झाली कामावर जाणारे कामगार तसेच दवाखान्यात जाणारी आजारी माणसांची अँम्बुलंन्स वेळेवर पोहचणार आहे . ही जनतेची आनंदाची भावना आहे .
Share this content:
