

प्रतिनिधी-दत्ता भगत
खेड तालुक्यातील शिरोली येथील वै. ह.भ.प. ज्ञानेश्वर देवराम शिंदे यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने ह.भ .प. बालाजी महाराज मेटे (भीमा कोरेगाव) यांची सुस्राव्य अशी चिंतनरूपी प्रवचन सेवा संपन्न झाली. “नामस्मरण हीच खरी भक्ती आहे”. देवाची आपली जर ओळख व्हायची असेल तर आणि देवाला आवडते व्हायचे असेल तर नामच ह्या गोष्टी करू शकते. जन्माचा आणि मृत्यूचा हा सोहळा असतो. प्रवचन हे जाणाऱ्या व्यक्तीसाठी नसून इथे असणाऱ्या लोकांसाठी आहे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. अनेक वेगवेगळे दाखले देऊन शिंदे कुटुंबियाचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला. काळूस जिल्हा परिषद गटातील आणि पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवारांनी , पाहुण्यांनी आणि ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण केल्या. महाराष्ट्र मिडिया टिव्ही चॅनलचे प्रतिनिधी,पत्रकार सत्यवानभाऊ शिंदे यांचे चुलते आदर्श उद्योजक जितेंद्र शिंदे व संदीप शिंदे यांचे ते वडील होते. शिरोली गावच्या विद्यमान उपसरपंच सौ. उज्वलाताई जितेंद्र शिंदे विद्यमान ग्रामपंचायत उपसरपंच यांचे ते सासरे होते. वडिलांच्या स्मरणार्थ जितेंद्र शिंदे , संदीप शिंदे या दोन बंधूंनी स्मशानभूमी मध्ये संपूर्ण काँक्रिटीकरण स्वखर्चातून करून शिंदे कुटुंबियांनी एक आदर्श उपक्रम केला. या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र चर्चा होत आहे. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन /प्रास्ताविक ह. भ. प. भागचंद वाडेकर सर, आदर्श मा. सरपंच मोहनभाऊ वाडेकर यांनी केले. ऋण व्यक्त महाराष्ट्र मीडिया टीव्ही चॅनेल प्रतिनिधी, पत्रकार सत्यवान शिंदे यांनी केले. खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांचे सुपुत्र मृग्मय काळे युवा सेना जिल्हाध्यक्ष यांनी आलेल्या सर्वांचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पसायदान घेऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
Share this content:
